Himanta Biswa Sarma Jharkhand : जेव्हा हिंदू एकसंध रहातो, तेव्हा कुठलीही गडबड किंवा गदारोळ होत नाही !

झारखंडच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान !

एकसंध हिंदू

रांची (झारखंड) – जेव्हा हिंदू एकसंध रहातो, तेव्हा कुठलीही गडबड किंवा गदारोळ होत नाही, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केले. या भाषणावरून ‘इंडि’ आघाडीने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून सरमा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की,

१. आसाममधील मदरसे बंद करण्यापासून अयोध्येत श्रीराममंदिर बांधेपर्यंत कुणीच गडबड करू धजावले नाही !

आसाममधील काही लोक म्हणत होते की, ‘आम्ही मदरसा बंद करू शकणार नाही.’ मी म्हणालो की, ‘भारताला सध्या मुसलमान धर्मगुरूंची नव्हे, तर डॉक्टर-इंजिनीयर यांची आवश्यकता आहे.’ त्यावर ते म्हणत होते की, ‘असे केले, तर गडबड किंवा गोंधळ होईल.’ मी त्यांना ठणकावून सांगितले की, मला एकदा तुम्ही गडबड करून दाखवा, मग मी पण बघतो कोण कशी गडबड करतो ? त्यानंतर मदरसे बंद करत गेलो; पण कोणतीही गडबड झाली नाही. श्रीराममंदिर बांधण्याच्या वेळीही हे लोक असेच म्हणत होते की, गडबड होईल; पण काय झाले ? जेव्हा हिंदू एकसंध रहातो, तेव्हा कुठलीही गडबड किंवा गदारोळ होत नाही.

२. ही निवडणूक हिंदूंच्या अस्मितेची निवडणूक !

काँग्रेसचा उद्देश हिंदूंच्या मतांचे जातीच्या आधारावर विभाजन करणे आणि एका विशिष्ट समुदायाची १०० टक्के मते घेणे, हाच आहे. झारखंडमध्ये जे काही चालले आहे, ते असेच चालू राहिले, तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या ५० टक्के होईल आणि घुसखोरांची लोकसंख्याही जवळपास सारखीच होईल. त्यामुळे ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे. घुसखोरांना हुसकावून लावणे आपल्याला आवश्यक आहे.