Why Haj Subsidy From KAFIRS ? : काफिरांच्या पैशांवर हज यात्रा कशी केली जाते ? – भाजपचा उलट प्रश्‍न

अयोध्या दीपोत्सवात सरकारी पैशाच्या वापरावर मौलानाने उपस्थित केले होते प्रश्‍न !

अयोध्या दीपोत्सव

नवी देहली : दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३० ऑक्टोबरला अयोध्येत आयोजित दीपोत्सवात ‘राम की पौडी’ येथे २८ लाख पणत्या लावण्यात आल्या. या वेळी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे  उद्घाटन केले. ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी दीपोत्सव कार्यक्रमात झालेल्या खर्चावरून योगी सरकारवर टीका केली. त्यावर भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘काफिरांच्या पैशांवर हज यात्रा कशी केली जाते ?’, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी आणि भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी

सरकारचा पैसा कोणत्याही धार्मिक कार्यावर खर्च करण्याची अनुमती आहे का ?

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये मौलाना साजिद रशिदी म्हणाले की, सरकार या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. जर तेच पैसे उच्च शिक्षण घेऊन फिरणार्‍या बेरोजगारांना दिले असते, तर कदाचित् त्यांना लाभ झाला असता. अनेक लहान-मोठी आस्थापने त्यांनी स्थापन केली असती. (सरकार मदरशांवरही पैसे खर्च करत आहेत, त्यातून देशाला काहीच लाभ मिळत नाही. उलट देशाला त्रासच अधिक होतो. याविषयी मौलाना का बोलत नाहीत ? – संपादक) त्यांना आम्ही सण साजरे करण्यापासून रोखत नाही; पण सरकारचा पैसा कोणत्याही धार्मिक कार्यावर खर्च करण्याची मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना अनुमती आहे का ? (हिंदूंच्या करातून मिळणार्‍या पैशातून देशात जगणार्‍या धर्मांधांनी आता पाकिस्तानात चालते व्हावे, असे हिंदूंनी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक) भाजपला केवळ ते ‘हिंदुहृदयसम्राट’ आहेत, असे दाखवायचे आहे.

भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी मौलानांचा चांगलाच समाचार घेतला. त्रिवेदी म्हणाले की,

सरकार सर्व मोठ्या हिंदु मंदिरांमधून सर्व देणग्या घेते. सरकार मंदिरांकडून जे काही घेते, त्यातील एक दशांश पैसेही मंदिरांवर खर्च केले जात नाहीत. हज यात्रेसाठी अनुदान म्हणून सरकारकडून खर्च केला जातो. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी इफ्तारचे आयोजन सरकारी पैशातून करण्यात आले, तेव्हा तुम्ही काफिरांनी दिलेला फराळ मोठ्या उत्साहात घेतला. मौलाना साजिद रशिदी यांच्या मते, ९० टक्के लोक काफिर आहेत. त्यामुळे काफिरांच्या पैशाने हज करायला हरकत नाही, असेच त्यांना वाटते.