SANATAN PRABHAT EXCLUSIVE : वांद्रे (मुंबई) येथे मशिदीला विरोध झाल्याच्या ठिकाणी बांधण्यात येत आहे ‘ख्रिस्ती’ नावाने शाळेची इमारत !

शाळेच्या आडून धार्मिक स्थळ निर्माण करण्याचे मुसलमानांचे षड्यंत्र असल्याचा स्थानिकांचा संशय !

बांधकाम चालू असल्याच्या ठिकाणी लावण्यात आलेला फलक

मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – वांद्रे (पश्‍चिम) येथे ‘माऊंट मेरी एज्युकेशनल ट्रस्ट’ द्वारे ‘माऊंट मेरी इंटरनॅशनल स्कूल’ या नावाने भव्य इमारत बांधण्याचे काम चालू आहे. नावावरून ‘कॉन्व्हेट स्कूल’ वाटत असले, तरी ज्या न्यासाकडून (ट्रस्टकडून) या शाळाची निर्मिती केली जात आहे त्या न्यासाचे विश्‍वस्त मात्र मुसलमान आहेत. त्यामुळे या शाळेच्या नावाखाली या ठिकाणी मुसलमानांचे धार्मिक स्थळ निर्माण करण्यात येत असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी या शाळेची इमारत बांधण्यात येत आहे, तेथे काही वर्षांपूर्वी बैठी चाळ होती. या चाळीतील निवासस्थाने टप्प्याटप्प्याने हटवून तेथे नमाजपठण करण्यात येऊ लागले. नमाजपठण करण्यापूर्वी तेथे ‘वजू’ (नमाजपठण करण्यापूर्वी हात-पाय धुण्यासाठी) करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. कालांतराने येथे मशिदीचे बांधकाम करण्याच्या हालचाली चालू झाल्यावर मात्र स्थानिकांच्या मशिदीच्या बांधकामाला विरोध केला. सध्या मात्र याच जागेवर ‘माऊट मेरी इंटरनॅशनल स्कूल’ या नावाने इमारत बांधकाम करण्यात येत आहे.

‘माऊट मेरी इंटरनॅशनल स्कूल’ या नावाने मशिद बांधकाम (प्रतिकात्मक चित्र)

मशिदीला विरोध झाल्यानंतर ‘ख्रिस्ती’नावाने ट्रस्टची निर्मिती !

ज्या न्यासाकडून ‘माऊंट मेरी इंटरनॅशनल स्कूल’च्या इमारतीचे बांधकाम चालू आहे त्या ‘माऊंट मेरी एज्युकेशनल ट्रस्ट’ची नोंदणी ३० ऑगस्ट २००५ या दिवशी झाली आहे. या ट्रस्टची नोंदणी महंमद सिद्दीक यांच्या नावे आहे आणि या न्यासाचे अन्य सदस्यही मुसलमानच आहेत. या ठिकाणी मशीद बांधण्याला विरोध झाल्यानंतरच या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे, तसेच मुसलमान विश्‍वस्त असलेल्या न्यासाचे नाव ‘माऊंट मेरी एज्युकेशनल ट्रस्ट’ असे का ठेवण्यात आले ? हा सर्वच प्रकार संशयास्पद आहे.

महानगरपालिकेची अद्याप शाळेसाठी अनुमती नाही !

शाळेची इमारतही ५२३.६० चौरस इतक्या अल्प क्षेत्रात बांधण्यात येत आहे. त्यामुळे शाळेसाठी मैदानही उपलब्ध करून देता येण्यासारखे नाही. या शाळेसाठी या न्यासाने शिक्षण विभागाकडून अनुमती प्राप्त केली असली, तरी त्यासमवेत शाळेचा आराखडा, विद्यार्थ्यांची प्रवेशपद्धती, तेथे कोणत्या सुविधा असतील यांविषयी कोणतीही माहिती शिक्षण विभाग किंवा मुंबई महानगरपालिका यांना सादर केलेली नाही. असे असतांना या न्यासाकडून शाळेच्या इमारतीचे बांधकाम मात्र चालू करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमानांच्या धूर्तपणाला काही सीमाच नसते. भूमी जिहाद करण्यासाठी ते काय थापा मारतील आणि भूमी बळकावतील, याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी ख्रिस्त्यांच्या नावाखाली मशीद बांधली, तर आश्‍चर्य नव्हे. मुसलमानांच्या या सर्व जिहादांच्या विरोधात कायदे करण्यासाठी आणि शासनाला बाध्य करण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि दबाव अजून पुरेसा पडत नाही, हेच यावरून लक्षात येते !