Bangladesh Hindus Arrested Sedition Charge : बांगलादेशात देशद्रोहाच्या प्रकरणात २ हिंदु तरुणांना अटक

लालदिघी मैदानावरील मोर्चाच्यावेळी हा भगवा ध्वज तेथे लावण्यात आला होता

चितगाव (बांगलादेश) : येथे राजेश चौधरी आणि हृदय दास या २ हिंदु तरुणांना बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाच्या वर भगवा ध्वज लावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. येथील न्यू मार्केटमधील आझादी स्तंभावर असणार्‍या राष्ट्रध्वजाच्या वर भगवा ध्वज लावल्यावरून १९ जणांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २५ ऑक्टोबरला सनातन जागरण मंचाने येथील लालदिघी मैदानावर मोर्चा काढला होता. तेव्हा हा भगवा ध्वज तेथे लावण्यात आला होता. या ध्वजावर ‘आम्ही सनातनी’ असे लिहिले होते. या घटनेनंतर फिरोज खान यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. बांगलादेशात राष्ट्रध्वजाच्या वर इतर कोणत्याही रंगाचा ध्वज फडकवणे, हे नियमांचे उल्लंघन आहे.

राजेश चौधरी आणि हृदय दास या हिंदु तरुणांना बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाच्या वर भगवा ध्वज लावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी केली अटक

संपादकीय भूमिका

हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केल्यानंतर आता सरकार अशा पद्धतीने हिंदूंचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करणार आहे का ?