Minority Hindus Morcha In Bangladesh : बांगलादेशात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा भव्य मोचा !

हिंदूंच्या संरक्षणाची केली मागणी !

बांगलादेशात हिंदूंनी मोर्चा काढत हिंदूंचे संरक्षण करण्याची केली मागणी

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात १ नोव्हेंबरला ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी मोर्चा काढत हिंदूंचे संरक्षण करण्याची मागणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सैनिक यांना तैनात करण्यात आले होते. देशभरात अनेक भागांत अशा प्रकारे सरकारविरोधी निदर्शने करण्यात येत आहेत. सध्या बांगलादेशात हिंदूंची संख्या ८ टक्के म्हणजेच १ कोटी ७० लाख इतकी आहे, तर मुसलमानांची संख्या तब्बल ९१ टक्के आहे.

१. ‘बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्‍चन ऐक्य परिषदे’ने सांगितले की, ४ ऑगस्टपासून हिंदूंवर २ सहस्रांहून अधिक आक्रमणे झाली आहेत. हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक समुदायांचे म्हणणे आहे की, अंतरिम सरकारने त्यांना पुरेसे संरक्षण दिले नाही. शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर धर्मांध इस्लामवादी अधिकाधिक प्रभावशाली झाले आहेत.

२. अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे म्हणणे आहे की, आक्रमणांची आकडेवारी अतिशयोक्तीपूर्ण आहे.

३. यापूर्वी २६ ऑक्टोबरला ‘सनातन जागरण मंच’ने अल्पसंख्यांकांचे संरक्षण आणि अधिकार या मागणीसाठी चितगाव येथे एक विशाल मोर्चा काढला होता. हिंदु अल्पसंख्यांकांनी ८ प्रमुख मागण्यांविषयी आवाज उठवला होता. जोपर्यंत बांगलादेश सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

भारतातील हिंदूंपेक्षा बांगलादेशातील हिंदू अधिक जागृत आहेत, असेच यातून म्हणावे लागेल !