सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नवचंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘२८.५.२०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नवचंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण मंगळुरू सेवाकेंद्रात पहात असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. अनुराधा पै

१. ‘यज्ञाचे संगणकीय प्रक्षेपण दाखवणे चालू झाल्यावर थोड्याच वेळात ‘मी यज्ञस्थळीच आहे’, असे वाटावे, इतका त्या यज्ञातून निघणार्‍या धुराचा गंध मला येत होता.

२. मध्येच २ मिनिटे मी यज्ञाच्या जवळ बसल्याप्रमाणे यज्ञाची उष्णता जाणवून मला थोडा घाम आला.

३. मी सिंहावर बसलेल्या देवीला डोळे भरून पाहिल्यानंतर डोळे मिटले. नंतर ‘डोळे उघडू नये’, असे मला वाटले.

४. मला जीभेवर गोड चव जाणवली.

५. मी सेवाकेंद्राच्या बाहेर आल्यावर मला यज्ञातून निघणार्‍या धुराचा गंध आला नाही; मात्र मी घरी आल्यावर यज्ञाच्या वेळी नेसलेल्या साडीला धुराचा गंध येत होता.

या अनुभूती देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हे पहाण्याचे भाग्य देणारे पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे (समष्टी) संत) यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. अनुराधा पै (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७१ वर्षे), मंगळुरू, (२८.५.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक