साधकाची प्रकृती अंतर्ज्ञानाने ओळखून त्याला साधनेच्या पुढील टप्प्यात नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘एकदा अन्य राज्यातील एक साधक अन्य राज्यातून सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आला होता. सत्संग चालू असतांना तो साधक बोलण्यास आरंभ करणार एवढ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला न बोलण्याविषयी खुणावले. त्यानंतरही तो साधक बोलू लागला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला न बोलता शांत रहाण्याविषयी खुणावले. याप्रसंगी माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर एरव्ही साधकांचे बोलणे पूर्ण ऐकून घेतात. मग त्या साधकाचे बोलणे त्यांनी ऐकून का घेतले नाही ?’ त्यानंतर काही कालावधीने माझा त्या साधकाशी संपर्क आला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘त्या साधकाची अनावश्यक पुष्कळ बोलण्याची प्रकृती आहे. त्यामुळे त्याची बहिर्मुखता वाढते आणि त्यात अन्य साधकांचाही वेळ वाया जातो. तेव्हा ‘तो साधक अंतर्मुख व्हावा आणि त्याला साधनेत साहाय्य व्हावे’, यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधकाला न बोलण्याविषयी खुणावले होते’, हे माझ्या लक्षात आले. कालांतराने त्या साधकाच्या साधनेचे प्रयत्न थोडे-फार होऊ लागले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी पुढील सत्संगात त्या साधकाला अन्य साधकांप्रमाणे बोलू दिले.
या प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर अंतर्ज्ञानाने साधकाची प्रकृती ओळखून त्याला साधनेचे अचूक मार्गदर्शन करतात आणि साधनेच्या पुढील टप्प्यात नेतात’, हे पुन्हा एकदा माझ्या लक्षात आले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.