एकल प्लास्टिकचा वापर करणार्या ७ व्यापार्यांकडून ४५ सहस्र रुपये दंड वसूल
कोल्हापूर – महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात एकल वापर प्लास्टिक (सिंगल यूज प्लास्टिक) बंदी मोहिमेची प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तावडे हॉटेल परिसर, शाहू पथकरनाका, राजारामपुरी परिसरात एकल वापर प्लास्टिकची पडताळणी करण्यात आली. यात ७ व्यापार्यांकडे असा साठा आढळून आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने ५ व्यापार्यांना प्रत्येकी ५ सहस्र, तर उर्वरित २ व्यापार्यांना प्रत्येकी १० सहस्र रुपये असा एकूण ४५ सहस्र रुपये दंड वसूल केला.
शहरामध्ये एकल वापर प्लास्टिकचा वापर करतांना आढळणारी आस्थापने, संस्था आणि नागरिक यांवर आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.