Bangladesh Sedition Case Against Hindus : बांगलादेशामध्ये ‘इस्कॉन’च्या सचिवासह १८ हिंदु संघटनांवर देशद्रोहाचा गुन्हा !
|
ढाका (बांगलादेश) – काही आठवड्यांपूर्वी बांगलादेशातील हिंदु नेत्यांकडून ‘सनातन प्रभात’ला माहिती मिळाली होती की, तेथील मुसलमानच नाही, तर सैन्य, सरकार, तसेच प्रशासन हिंदूंच्या मुळावर उठणार आहेत. ते आता प्रत्ययास येऊ लागले आहे. ‘इस्कॉन’च्या बांगलादेशातील प्रमुखांपैकी एक असलेले चितगाव येथील इस्कॉनचे बांगलादेशातील सचिव चिन्मय दास ब्रह्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ते एकटेच नाहीत, तर आणखीही १८ अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या विरुद्ध हा गुन्हा नोंदवला आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या विरुद्ध १ नोव्हेंबरला हिंदूंकडून आंदोलने केली जात आहेत.
चिन्मय दास यांनी २५ ऑक्टोबरला चितगावात एका मोर्चाचे आयोजन केले होते. या वेळी बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाच्या वर ‘इस्कॉन’चा भगवा ध्वज फडकावल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे. यातून या ध्वजाला कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी २ जणांना अटकही करण्यात आली आहे. दास हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सातत्याने मोर्चे आणि आंदोलने यांचे आयोजन करत आहेत.
चंद्र आणि तारा असणारा ध्वज बांगलादेशाचा राष्ट्रध्वज नाही ! – चिन्मय दासदास यांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या कारवाईवर सांगितले की, मोर्चाच्या दिवशी काही लोकांनी चंद्र आणि तारा असणार्या ध्वजाच्या वर भगवा ध्वज फडकवला होता. चंद्र आणि तारा असलेला ध्वज बांगलादेशाचा राष्ट्रध्वज नाही. ध्वज फडकवणारे कोण होते, हे मला ठाऊक नाही; पण संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. |
संपादकीय भूमिकाइस्लामी बांगलादेशी सरकारकडून हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यासाठी प्रयत्न केले जाणे, यात काय आश्चर्य ? |