Muslim Population In India : भारतात वर्ष २०५० पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या होणार ३१ कोटी

  • ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण !

  • भारत जगातील सर्वाधिक मुसलमान असणारा देश होणार

  • हिंदूंची लोकसंख्या १ टक्क्याने घटणार !

नवी देहली – अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने ‘द फ्यूचर ऑफ वर्ल्ड रीजन्स’ या नावाने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार वर्ष २०५० पर्यंत भारत जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला देश होईल. सध्या इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मुसलमान आहेत. भारतात मुसलमानांची संख्या ३१ कोटींहून अधिक होईल. ही देशाच्या लोकसंख्येच्या १८ टक्के असणार आहे. दुसरीकडे हिंदू ७७ टक्के असतील.

सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार जगभरातील हिंदूंची लोकसंख्या वर्ष २०५० पर्यंत जवळपास ३४ टक्क्यांनी वाढून १४० कोटी इतकी होईल. ही जागतिक लोकसंख्येच्या केवळ १४.९ टक्के इतकीच असणार आहे.

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदू आणखी अल्प होणार !  

अल्प प्रजनन दर, धर्मांतर, स्थलांतर आदी कारणांमुळे वर्ष २०५० मध्ये हिंदूंची अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे लोकसंख्या आणखी अल्प होणार आहे.

अ. पाकिस्तानात वर्ष २०१० मध्ये १.६ टक्के हिंदु होते. वर्ष २०५० मध्ये ते १.३ टक्का होतील.

आ. बांगलादेशात वर्ष २०१० मध्ये ८.५ टक्के हिंदु होते. वर्ष २०५० मध्ये ते ७.२ टक्के होण्याचा अंदाज आहे.

इ. अफगाणिस्तानात वर्ष २०१० मध्ये ०.४ टक्के हिंदू होते. ते आता ०.३ टक्के होण्याचा अंदाज आहे. (या देशांत सध्या हिंदूंवर होणारे अत्याचार पहाता वर्ष २०५० पर्यंत त्यांचे अस्तित्व तरी उरेल का ? असाच प्रश्‍न आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश करण्याचे जिहाद्यांचे स्वप्न साकार होणार असेच यातून स्पष्ट होते. यानंतर जे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंचे झाले, तेच भारतात होईल. हे पहाता हिंदूंनी संघटित होऊन भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी सिद्ध होणे हा जन्ममरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे !
  • या लोकसंख्या वाढीची आणि पुढे त्यामुळे हिंदूंच्या होणार्‍या स्थितीची माहिती कोणताही ढोंगी निधर्मी राजकीय पक्ष हिंदूंना देणार नाही, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !