Haveri Waqf Board Land Jihad : हावेरी (कर्नाटक) येथे हिंदूंची मंदिरे वक्फ बोर्ड कह्यात घेण्यावरून तणाव
मुसलमानाच्या घरावर दगडफेक आणि वाहनाची जाळपोळ
हावेरी (कर्नाटक) – हावेरी जिल्ह्यातील कडाकोळ गावातील हिंदूंची घरे, भूमी आणि मंदिरे वक्फ बोर्ड कह्यात घेणार असल्यावरून तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंना माहिती मिळाली की, गावातील मुसलमानांनीच येथील हिंदूंची भूमी वक्फला देण्यासाठी याचिका केली आहे. यावरून येथे हिंदु आणि मुसलमान यांच्यात वाद होऊन दगडफेकीची घटना घडली. ३० ऑक्टोबरच्या रात्री उशिरा ही घटना घडली.
१. गावात मुसलमानांनी हनुमान मंदिर आणि दुर्गा मंदिर यांच्या परिसरातील भूमी वक्फ भूमी म्हणून घोषित करण्यासाठी याचिका प्रविष्ट (दाखल) केल्याचा आरोप स्थानिक हिंदूंनी केला आहे. यानंतर गावातील हिंदूंनी गावातील महंमद रफी याच्याकडे याविषयी विचारणा केली असता वाद निर्माण झाला. यानंतर लोकांनी महंमद रफी याच्या घरावर दगडफेक केली. एक मोटारसायकल जाळण्यात आली. या दगडफेकीत ५ जण घायाळ झाले. यातील गंभीररित्या घायाळ झालेल्यांना हुब्बळ्ळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात राखीव पोलिसांची तुकडीही तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे ३२ जणांना अटक केल्याचे म्हटले जात आहे. यातील बहुतांश हिंदू असल्याचे सांगितले जाते.
२. भूमीच्या नोंदी पालटल्याचा आरोपही गावातील हिंदूंनी केला आहे. राज्याचे वक्फ व्यवहार मंत्री जमीर अहमद यांच्या आदेशानंतर भूमीच्या नोंदी पालटण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठीचे आदेशही काढण्यात आले. गावातील हिंदूंना भीती वाटते की, त्यांची घरेही वक्फच्या नियंत्रणात जातील.
३. वक्फ बोर्डाने दिलेल्या सूचीची पडताळणी करून अहवाल पाठवण्याची प्रक्रिया चालू केली असून यामुळे वक्फची कोणतीही मालमत्ता नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
४. या प्रकरणानंतर मंत्री जमीर अहमद म्हणाले की, कडाकोळ गावातील वाद दुःखद असून वक्फ लोकांच्या भूमी घेणार नाही.
५. काँग्रेसने मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी वक्फ बोर्डाला भूमी नियंत्रणात घेण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. हावेरीचे भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वक्फविषयी प्रसारित केलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात, असे म्हटले आहे.
जमीर अहमद अधिकार्यांना निरपराध हिंदूंवर कारवाई करण्यास भाग पाडत आहेत ! – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशीकेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आरोप केला की, हावेरी जिल्हा पंचायतच्या कार्यकारी अधिकार्यांनी हनुमान मंदिर आणि दुर्गा मंदिर यांना नियंत्रणात घेण्याचे आदेश दिले आहेत. काल वक्फ बोर्डाचे सदस्य तेथे मंदिरे नियंत्रणात घेण्यासाठी गेले असता लोकांनी त्यास विरोध केला. पोलीस घटनास्थळी पोचले आणि ६० ते ७० वर्षांपासून तेथे रहाणार्या स्थानिक हिंदूंविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यांना (वक्फला) मंदिरे नियंत्रणात घ्यायची आहेत. स्थानिक लोकांना बेघर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारच्या आणि विशेषतः पंचायतीच्या या कृतीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. जमीर अहमद अधिकार्यांना निरपराध हिंदूंवर कारवाई करण्यास भाग पाडत आहेत.
|
संपादकीय भूमिकावक्फ कायदा रहित करणे किती आवश्यक झाले आहे, हे प्रतिदिन समोर येणार्या अशा घटनांमधून तीव्रतेने जाणवत आहे. हिंदूंनी आता केंद्र सरकारवर वक्फ कायद्यात पालट करण्याऐवजी तो रहित करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे ! |