हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या हलालमुक्त दिवाळी अभियानाला काणकोणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद !

काणकोण येथे एका रहदारीच्या ठिकाणी लावण्यात आलेला फलक

काणकोण, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग बोर्ड), मंदिरे आदी सार्वजनिक ठिकाणी ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानामध्ये सहभागी होण्याविषयी फलक लावण्यात आले. ही मोहीम गोव्यात सर्वत्र राबवण्यात आली. काणकोण तालुक्यात यासंबंधी बागायतदार बाजाराच्या दुकानावर, चावडी, चाररस्ता आदी ४ रहदारीच्या ठिकाणी लावण्यात आलेले ‘हलालमुक्त दिवाळी साजरी करूया’, हे फलक पाहून धर्माभिमान्यांनी समाधान व्यक्त करून पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

काणकोण येथे बागायतदार बाजाराच्या दुकानावर लावण्यात आलेला फलक

या उपक्रमास सर्व हिंदूंनी संघटित होऊन पाठिंबा द्यावा !

काणकोण हलालमुक्त करण्याचे हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे शर्थीचे प्रयत्न पाहून येत्या काही मासांत काणकोणमध्ये क्रांती घडेल, यात तीळमात्र शंका नाही. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! या उपक्रमास आपण सर्व हिंदूंनी संघटित होऊन पाठिंबा देणे, ही काळाची आवश्यकता आहे.
– श्री. सिद्धार्थ देसाई, काणकोण येथील भाजपचे कार्यकर्ते, ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी

प्रत्येक सण हलालमुक्त साजरा करूया !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अभिनंदन ! पुढील काळात हिंदु धर्मरक्षणासाठी सज्ज होण्याची हीच वेळ आहे. आमचेच काही लोक स्वार्थी वृत्तीने गणोजी शिर्केसारखे फितूर होऊन यवनांना साथ देत आहेत, ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. येथे इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी ते टपलेले आहेत. आम्ही स्वस्थ बसून चालणार नाही. संघटित होऊन यवनी शक्तीच्या नायनाटासाठी सज्ज होऊया. भावी पिढीला हिंदु धर्माची शिकवण देण्यासाठी प्रयत्न करूया आणि प्रत्येक सण हलालमुक्त साजरा करूया.
– श्री. आनंदू देसाई, खोतीगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच