आदित्यचा दिशा सालियान प्रकरणामध्ये सहभाग असेल, असे वाटत नाही ! – अमित ठाकरे
मुंबई – आमची आता मैत्री आणि संवाद नाही, समोर आल्यावर ‘हाय’ बोलेल; पण संवाद होणार नाही. वर्ष २०१७ वेळी खरे काय आणि खोटे काय ? हे आम्ही पाहिलेले आहे. आम्ही परिवार आणि नाती म्हणून पथ्य पाळतो, मला पण वाटते आदित्यचा दिशा सालियान प्रकरणामध्ये सहभाग नसेल. ‘मर्डर’ वगैरे ‘लेव्हल’ला (हत्या वगैरे पातळीला) तो जाईल, असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.
यापूर्वी अभिनेते सुशांत सिंह यांच्याही मृत्यूमागे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी अनेकदा केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना सुशांत सिंह याने कोरोना महामारीच्या काळात रहात्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती.
या वेळी अमित ठाकरे म्हणाले की, सूची येईपर्यंत मलाही ठाऊक नव्हते की, मी माहीममधून लढणार आहे. मला अपेक्षा होती उद्धव ठाकरे उमेदवार देतील. साहेब नाती जपण्याचा निर्णय घेतात, आम्ही यावर्षीसुद्धा उमेदवार देणार नव्हतो; पण कुठेही काम दिसले नाही, लोकांमध्ये अप्रसन्नता आहे. त्यामुळे तिथे आम्ही वरळीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्याबद्दल बोलत असतील, तर माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, तेव्हा मला काय राज ठाकरेंनाही ठाऊक नव्हते की, मी निवडणुकीला उभा रहाणार आहे.