बहुरूपातूनी येशी दर्शन देण्या ।
रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील सौ. स्वाती शिंदे यांना सुचलेल्या गुरूंप्रतीचा भावबोध करून देणार्या काव्यरचना !
‘श्रीगुरु चराचरात सामावलेले आहेत; पण मी अज्ञानी असल्याने त्यांना पाहू शकत नाही. ‘त्याचे ज्ञान झाले, तर माझा उद्धार होईल’, या दृष्टीने सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.’
बहुरूपातूनी येशी दर्शन देण्या ।
मी अज्ञानी त्यात तुज पहाण्या ॥ १ ॥
अंतरातूनी याचे करिती मंथन ।
जन्मोजन्मीचे सोडवती माझे बंधन ॥ २ ॥
गुरुचरणीचे दास आम्ही,
हीच आमची गौरवशाली ओळख ।
‘बर्याचदा सनातनचे साधक समाजात गेल्यावर असे अनुभवतात, ‘कोणतीही बाह्य ओळख नसतांना समाजातील लोक ‘सनातनचे साधक’ म्हणून स्वतःहून त्यांना ओळखतात. ते साधकांना विचारतात, ‘तुम्ही सनातनचे साधक आहात ना ?’ खरे तर बोलण्यातून किंवा स्मृतिचिन्ह (बिल्ला) वा कोणतीही वस्तू त्या वेळी ओळख दाखवण्यासाठी समवेत नसतांनाही लोकांनी साधकांना ‘सनातन’चे म्हणून ओळखणे, ही गुरुदेवांची कृपा आणि त्यांचे संस्कार आहेत. जसे ‘एखाद्या मुलाच्या वागणुकीवरून त्याच्या आई-बाबांच्या नावाने त्याला लोक ओळखतात’, तसे मला वाटले. त्या वेळी मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली. दुसर्या कोणत्याही बाह्य गोष्टीवर नाही, तर आंतरिक गोष्टीतून ते समाजाला साधकांची ओळख करून देतात’, यावरून गुरुदेवांनीच मला काही ओळी सुचवल्या. त्या येथे दिल्या आहेत.’
श्री गुरूंचे संस्कार हीच आमची ओळख ।
गुरुचरणी शरणागती हीच आमची ओळख ॥ १ ॥
धर्माचरण हीच आमची ओळख ।
राष्ट्र-धर्मासाठी समर्पण हीच आमची ओळख ॥ २ ॥
भगवंताप्रतीचा भाव हीच आमची ओळख ।
भगवंताच्या गुणांचे आमच्यावरील प्रतिबिंब ।
हीच आमची ओळख ॥ ३ ॥
आमची अशी ना कोणती ओळख ।
गुरुचरणीचे दास आम्ही ।
हीच आमची गौरवशाली ओळख ॥ ४ ॥
– सौ. स्वाती संदीप शिंदे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |