मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा मुख्यमंत्री होणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबई – मनसेच्या पाठिंब्याने राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. या वेळी राज ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांप्रमाणे आम्ही सत्ता मिळवण्यासाठी स्वार्थी भूमिका घेतलेली नाही. भाजपचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, हे आमचे आजही सांगणे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘इंस्टाग्राम’च्या खात्यावरून राज ठाकरे यांच्यासमवेतचे छायाचित्र प्रसारित केले आहे. राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महायुतीची सत्ता येईल, असे मत व्यक्त केले.