Talibani Fatwa Against Women : तालिबानने महिलांना मोठ्याने कुराण वाचण्यावरही घातला प्रतिबंध !

काबुल (अफगाणिस्तान) : तालिबान सरकारने अफगाणितस्तानमधील महिलांवर आता अधिक तीव्र प्रतिबंध घालण्यास आरंभ केला आहे. कुठेही प्रवास करतांना एकट्याने न करता कुणा पुरुष नातेवाइकाला समवेत नेण्याच्या नियमानंतर आता तालिबानने महिलांनी मोठ्याने कुराणही वाचता कामा नये, असा आदेश दिला आहे. अन्य महिला असतांनाही त्या मोठ्याने कुराण वाचू शकणार नाहीत. तालिबानचा मंत्री महंमद खालिद हनाफी याने या नियमाचे समर्थन केले आहे. हनाफीच्या मते, स्त्रीचा आवाज ही खासगी गोष्ट आहे. हा आवाज इतरांनी ऐकू नये, अगदी इतर महिलांनीही ऐकू नये.

१. तालिबानने नुकत्याच दिलेल्या अन्य एका आदेशानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या चेहर्‍यासह संपूर्ण शरीर झाकावे लागेल.

२. मानवाधिकार तज्ञ आणि अफगाण महिल यांना भीती आहे की, नव्या आदेशामुळे महिलांच्या मूळ प्रार्थनांवरच बंदी घातली जाऊ शकते.

३. महिलांना त्यांच्या जवळच्या कुटुंबाबाहेरील पुरुषांशी संपर्क साधण्यासही मनाई करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

मनुस्मृती स्त्रीविरोधी असल्याची आरोळी ठोकत हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे कथित स्त्रीमुक्तीवाले (फेमिनिस्ट) तालिबान, त्यांच्या श्रद्धा आणि त्यांच्याकडून महिलांवर घातले जाणारे जाचक प्रतिबंध यांवर कधीच काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !