Mumbai Oppose To Jai Shri Ram : रुग्णालयाबाहेर विनामूल्य जेवण वाटणारा वृद्ध हिंदू ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगत असल्याने मुसलमान महिलेचा विरोध !
पोलिसांकडून वृद्ध हिंदूवरच गुन्हा नोंद !
मुंबई – येथील टाटा रुग्णालयाच्या बाहेर विनामूल्य जेवण देणारी वृद्ध हिंदु व्यक्ती प्रत्येकाला जेवण देतांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगत होती. जे हिंदु होते, ते ‘जय श्रीराम’ म्हणत जेवण घेत होते. या वेळी एका मुसलमान महिलेने जेवण घेतांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यास नकार दिला. या मुसलमान महिलेला ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितले असता ती उर्मटपणे तावातावाने ‘तुझ्या बापाची भूमी आहे का ?’ असे म्हणून त्या वृद्ध हिंदूच्या अंगावर ओरडायला लागली. त्यावर त्या वृद्ध हिंदूने ‘हो माझ्या बापाची आहे; पण तुझ्या बापाची आहे का ?’ असा प्रतिप्रश्न केला. याचे चित्रीकरण एका कथित सर्वधर्मसमभावी पत्रकाराने केले आणि त्या वृद्धाला त्याचे वागणे अयोग्य असल्याचे सांगितले. (मुसलमान दिवाळी साजरी करायला विरोध करतात, ही घटना पत्रकार टीपत नाहीत; मात्र ढोंगी सर्वधर्मसमभावी पत्रकार हिंदूंनी त्यांच्या रक्षणार्थ काही पावले उचलली, तर त्याचा गवगवा करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) तेव्हा त्या वृद्धाने ‘ती महिला बदमाश आहे’, असे त्याला सांगितले. या घटनेवरून मुंबई पोलिसांनी मात्र तत्परतेने वृद्ध हिंदूच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सामाजिक माध्यमावरून मात्र या घटनेच्या संदर्भात उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
संपादकीय भूमिका
|