कॅनडातील गुन्हेगार भारतातील त्यांच्या गुंडांना सूचना देतात ! – Canada Police

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस आयुक्त माईक ड्यूहेम

ओटावा (कॅनडा) – रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी सांगितले की, कॅनडाचे गुन्हेगार भारतात काम करणार्‍या त्यांच्या गुंडांना सूचना करत असण्याची दाट शक्यता आहे.

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस आयुक्त माईक ड्यूहेम २ आठवड्यांपूर्वी भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक वादावर चर्चा करण्यासाठी इतर कॅनेडियन पोलीस अन् सरकारी अधिकारी यांसह संसदीय समितीमध्ये उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी वरील माहिती दिली.