हिंदु तरुणीला ‘तुझे २४ तुकडे करीन’ असे धमकावणार्या मुसलमानाला जामीन !
सुरत्कल (कर्नाटक) – येथील आरोपी मुसलमान तरुणाने पीडित हिंदु तरुणीला ‘मला सहकार्य कर, अन्यथा मी तुझे २४ तुकडे करीन’, अशी धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. हिंदु तरुणीला छळणार्या आरोपी शारिक याला न्यायालयाने नुकताच जामीन संमत केला. विहिंप, हिंदु जागरण मंच, हिंदु महासभा आणि स्थानिक यांनी आरोपींविरुद्ध केलेल्या साध्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे आणि तरुणीच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे.
१. येथील सदाशिवनगरचा रहिवासी असलेला शारिक पीडित हिंदु मुलीच छेड काढत होता. शारिकने पीडित हिंदु तरुणीचे फेसबुक खाते ‘हॅक’ केले आणि तिला अश्लील संदेश पाठवून धमकावले होते.
२. शारिकच्या सततच्या छळाला कंटाळून तरुणीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ‘शारिक आणि नूरजान यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत आहे’, असे तिने एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते. ‘मुसलमानांच्या हातून अत्याचार करून मारले जाण्याऐवजी आताच मृत्यू स्वीकारते’, असेही तिने यात लिहिले होते.
संपादकीय भूमिकाइतक्या मोठ्या गंभीर प्रकरणात आरोपीला जामीन कसा मिळतो ? पोलिसांनी आरोपी मुसलमान असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेच यातून लक्षात येते. या प्रकरणी हिंदूंनी संघटितपणे पोलिसांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे ! |