US Warned North Korean : उत्तर कोरियाचे सैनिक युक्रेन युद्धात सहभागी झाल्यास त्यांचे मृतदेहच परत पाठवले जातील ! – अमेरिका

अमेरिकेची उत्तर कोरियाला चेतावणी !

अमेरिकेचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील उप राज्यदूत रॉबर्ट वुड व उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन

वॉशिंग्टन (अमेरिका) – उत्तर कोरियाच्या सैन्याने रशियाच्या समर्थनार्थ युक्रेनमध्ये प्रवेश करणे योग्य आहे का ? मला त्यांना सांगायचे आहे की, केवळ त्यांचे मृतदेहच त्यांच्या देशात परततील. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी अशा प्रकारच्या अविचारी आणि धोकादायक कृत्यात सहभागी होतांना दोन वेळा विचार करायला हवा, असा सल्ला मी त्यांना देईन, अशा शब्दांत अमेरिकेचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील उप राज्यदूत रॉबर्ट वुड यांनी चेतावणी दिली आहे.

अमेरिकेच संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे की, युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला साहाय्य केल्याने युद्ध अधिक तीव्र होईल. गेल्या अडीच वर्षांपासून चालू असलेल्या या युद्धाला आणखी चालना मिळेल. पूर्व रशियामध्ये उत्तर कोरियाचे अनुमाने १० सहस्र सैनिक आधीच तैनात आहेत, त्यांच्या हातात रशियाची शस्त्रे आहेत.