India China Border Diwali Celebration : भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी दिवाळीनिमित्त एकमेकांना दिली मिठाई

लदाख सीमेवर दिवाळीनिमित्त चीन आणि भारत यांच्या सैनिकांनी एकमेकांना वाटली मिठाई !

नवी देहली : भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार लडाख येथील डेपसांग अन् डेमचोक येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर या दिवशी दिवाळीनिमित्त चीन आणि भारत यांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई वाटली. येथे आता गस्त घालण्याविषयी लवकरच ग्राऊंड कमांडरच्या अधिकार्‍यांमध्ये चर्चा होणार आहे.

भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी म्हटले होते की, सैन्य मागे घेणे, ही पहिली पायरी आहे. पुढील पायरी म्हणजे तणाव न्यून करणे. हा तणाव तेव्हाच न्यून होईल, जेव्हा भारताला निश्‍चिती होईल की, चीनलाही तेच हवे आहे. तणाव न्यून झाल्यानंतर सीमेचे व्यवस्थापन कसे करायचे, यावर चर्चा केली जाईल.

संपादकीय भूमिका

चीनने मिठाई दिली, तरी चीनचा इतिहास विश्‍वासघाताचा असल्याने त्याच्यापासून सतर्क रहाणेच आवश्यक आहे !