शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा ‘स्कॉच’ पुरस्काराने सन्मान !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाला देशात गौरवण्यात आले आहे. देशात प्रतिष्ठित समजला जाणारा ‘स्कॉच’ पुरस्कार या योजनेला घोषित झाला आहे. ३० नोव्हेंबर या दिवशी नवी देहली येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. देशातील विविध २८० प्रकल्पांमधून या अभियानाची निवड झाली आहे. नागरिक केंद्रीत प्रशासन श्रेणीतील ८० हून अधिक उपक्रमांना मागे टाकून ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाने पहिला क्रमांक पटकावला आहे. या अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. एका खासगी संस्थेकडून हा पुरस्कार चालू करण्यात आला आहे. तो देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे, असा या संस्थेचा दावा आहे. हा पुरस्कार भारताला एक प्रगतीशील राष्ट्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार्या संस्थांना मान्यता देतो.