जन्मपत्रिका पाहून ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्‍या साधकाने सांगितल्यानुसार ग्रहशांतीचा मंत्रजप करतांना पुष्कळ त्रास होणे, त्यामुळे निदान अचूक असल्याचे लक्षात येणे आणि त्रास होण्यामागील शास्त्र समजून सांगणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

‘माझी जन्मपत्रिका पाहून ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्‍या साधकाने मला दोन ग्रहांची शांती करण्यास सांगितले आहे. त्यासाठी प्रथम या दोन्ही ग्रहांचा ठराविक संख्येने जप करायचा आहे. हा मंत्रजप आहे. तो करत असतांना मला पुष्कळ त्रास होतात. ते त्रास पुढे दिले आहेत. 

सुश्री (कु.) राजश्री सखदेव

१. मंत्रजपाला आरंभ केल्यानंतर माझे डोके अतिशय दुखायला लागले. डोके दुखू लागल्यानंतर ते पुष्कळ वेळ दुखत रहाते. माझे मन नामजपात किंवा सेवेत असेल, तर ‘डोके दुखत आहे’, हे माझ्या लक्षात येत नाही; पण एरव्ही डोके तीव्रतेने दुखते.

२. ‘मंत्रजप कधी संपेल ?’, असे मला होते.

३. ‘ठरवलेल्या संख्येत मंत्रजप न करता त्रास होत असल्याने तो थांबवावा’, असे मला वाटते.

४. मंत्रजप चालू केल्यानंतर ४ – ५ दिवसांनी ‘माझी आतडी पिळवटून निघत आहेत’, असे मला वाटते. मंत्रजप करतांना आणि मंत्रजपानंतर ३ – ४ घंट्यांपर्यंत असा त्रास होतो. कधी कधी दिवसभर असे होते.

५. कधी कधी माझी प्राणशक्ती इतकी न्यून होते की, मला ‘बसून मंत्रजप करणे कठीण आहे’, असे वाटते.

६. मला दिवसभर थकल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटते. माझ्या मनाला उत्साह नसतो.

हे त्रास पाहून ‘ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्‍या साधकाने केलेले निदान किती अचूक आहे !’, हे माझ्या लक्षात आले. ‘असे त्रास का होतात ?’, हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे मला कळले. बाहेर समाजात मंत्रजपामुळे त्रास झाले, तर कुणी जप करणे सोडून देईल; पण ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीमागील शास्त्र समजून सांगितल्यामुळे मला प्रत्येक प्रसंगाकडे त्या दृष्टीकोनातून पहाता येऊ लागले’, याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.८.२०२४)