कर्नाटक : संपत्तीसाठी सैतानाला हिंदु पत्नीपासून झालेल्या मुलाचा बळी देण्याचा मुसलमान पित्याचा प्रयत्न
‘लव्ह जिहाद’ विवाहाचा खरा उद्देश उघड !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे सद्दाम नावाच्या व्यक्तीने संपत्तीसाठी स्वतःच्या मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सद्दाम याने ४ वर्षांपूर्वी एका हिंदु युवतीशी लग्न केले होते. तेव्हा त्याने स्वतः हिंदु युवक असल्याचे सांगून लग्न केले होते. त्याने स्वतःचे नाव ‘आदिश्वर’ असल्याचे सांगितले होते. विवाहानंतर या जोडप्याला एक मुलगा झाला. त्यानंतर सद्दाम याने पत्नीवर ‘कुट्टी सैतान पूजा’ करण्याचा आग्रह धरला. ‘कुट्टी सैतान पूजेत मुलाचा बळी दिल्यास संपत्ती मिळेल’, असे त्याने सांगितले होते. या पार्श्वभूमीवर तो रात्रीच्या वेळी तंत्र साधना करत होता. या प्रकरणी पत्नीने पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुलाचा जीव वाचवला.
संपादकीय भूमिकाअशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी काँग्रेस सरकार प्रयत्न करील का ? |