Dhirendra Krishna Shashtri : दिवाळीला फटाके बंदीचे कटकारस्थान रचले जाते; मात्र बकरी ईदवर कुणी बोलत नाही !
छतरपूर (मध्यप्रदेश) – दिवाळीला फटाके बंदीचे कटकारस्थान रचले जातेे; मात्र बकरी ईदच्या वेळी कुणी प्रश्न का उपस्थित करत नाही ?, अशा शब्दांत येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदुद्रोह्यांवर प्रहार केला. दिवाळीत फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याची मागणी केली जाण्याच्या सूत्रावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया व्यक्त केली.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी मांडलेली सूत्रे
१. हे देशाचे दुर्दैव आहे की, सनातन हिंदु धर्माचे सण आले की, कुणी कायदेभंगाची चर्चा करतो, कुणी फटाक्यांवर बंदीची मागणी करतो, तर कुणी म्हणतो की, तेलाचे दिवे लावून किती गरीब लोकांना लाभ होईल ?
२. मला त्यांना सांगायचे आहे की, या देशातही बकरी ईद साजरी केली जाते, ती थांबली पाहिजे. बकरी ईदच्या वेळी लाखो रुपयांच्या बकर्यांची कत्तल केली जाते, ते रुपये गरिबांमध्ये वाटून द्या, याचा लाभ त्यांना होईल.
३. फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे ज्ञान पाजळले जाते; मात्र १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या नावाने फटाके फोडले जातात, तेव्हा ज्ञान कुठे जाते ? तेव्हा प्रदूषण होत नाही का ? दिवाळी आली की प्रदूषण होते का ?
४. होळी येताच ‘पाणी खराब होते’, अशी ओरड केली जाते. बकरी ईदला पशू हत्यांमुळे रक्तपात झाला की, हे लोक निवेदने देत नाहीत, मागण्या करत नाहीत, कायदा आणण्याविषयी बोलत नाहीत.
५. हिंदूंच्या सणांवरचा ढोंगीपणा थांबला पाहिजे. आम्ही दिवाळी चांगली साजरी करू, आम्ही सुतळी बाँब विकत घेतला आहे.
अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी
पंजाब, हरियाणा, देहली आणि तमिळनाडू या राज्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी फटाक्यांच्या वापरावर कठोर नियम लागू केले आहेत. केवळ ‘ग्रीन क्रॅकर्स’ (पर्यावरण पूरक फटाके) मर्यादित काळासाठी अनमुती आहे, जे प्रदूषण अल्प करण्यासाठी उपयुक्त मानले जातात.