Nepal’s new Rs 100 note : नेपाळ त्याच्या १०० रुपयांच्या नव्या नोटेवर भारताचा काही भूभाग नेपाळमध्ये दाखवणार !
भारतीय व्यापार्यांनी व्यक्त केली चिंता !
नवी देहली – भारत आणि नेपाळ यांच्यात तणाव निर्माण व्हायला आणखी एक कारण पुढे आले आहे. नेपाळ त्याच्या १०० रुपयांच्या नेपाळी नोटेवरील नकाशामध्ये सीमेवरील काही भारतीय भूभागही दाखवणार असल्याचे म्हटले जात आहे.
१. १९९० च्या दशकापासून नेपाळ भारताच्या कालापानी क्षेत्रावर त्याचा दावा करत आहे. खरेतर कालापानी क्षेत्र प्राचीन काळापासून भारतीय भूभागच आहे.
२. नेपाळचे म्हणणे आहे की, सुगौली करारानंतर कालापानी प्रदेश भारताने नेपाळकडून घेतला होता. हा करार तत्कालीन राजेशाही आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात वर्ष १८१६ मध्ये झाला होता.
३. भारताच्या फाळणीनंतर त्याने ब्रिटीश प्रशासकांनी भारताला दिलेल्या भूमीचे एक इंच क्षेत्रफळही वाढवले नाही.
४. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि त्याचा काही भाग गमावला असतांनाही नेपाळ अनेकदा भारतावर विस्तारवाद अन् नेपाळचा भूभाग बळकावल्याचा आरोप करतो.
५. आता नेपाळी नोटेवर भारताचा काही भूभाग त्याच्या नकाशात दाखवल्याने लोकांच्या मनात आणि नातेसंबंधात तेढ निर्माण होईल, अशी चिंता सीमेवरील भागातील भारतीय व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
६. नेपाळने असे चिथावणीखोर काम करू नये. भारताने नेपाळ किंवा इतर कोणत्याही शेजारी देशाकडून एक इंचही भूमी घेतली नाही. नेपाळ आणि भारत यांचे प्राचीन काळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असेही काही व्यापार्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाचीनचा छुपा हात असल्याविना इवलासा नेपाळ भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही. नेपाळने स्वत:चे हित जपण्यासाठी असे पाऊल उचलू नये, अन्यथा तो त्याच्यासाठी आत्मघात ठरेल ! |