Fake FB Mangaluru Police : मंगळुरू पोलीस आयुक्तांच्या नावाने उघडण्यात आले खोटे फेसबुक खाते !
मंगळुरू (कर्नाटक) : सायबर फसवणूक करणार्यांनी मंगळुरू पोलीस आयुक्त अनुपम अगरवाल यांच्या नावाने एक खोटे फेसबुक खाते उघडले आहे. याद्वारे मित्रत्व विनंती पाठवली अन् पैसे देण्याची मागणी केली. याची माहिती मिळताच आयुक्त अगरवाल यांनी सायबर शाखेत गुन्हा नोंदवून ‘माझ्या नावाने येणार्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका’ असे जनतेला आवाहन केले आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांचा वचक अल्प झाल्याने गुन्हेगार अशी कृती करण्याचे धाडस करतात ! |