Delhi Drugs Seized : देहलीमध्ये ९५ किलो अमली पदार्थ जप्त
तिहार कारागृहाच्या ‘वॉर्डन’सह ४ जणांना अटक
(वॉर्डन म्हणजे देखरेख करणारा वरिष्ठ अधिकारी)
नवी देहली – ग्रेटर नोएडा येथे देहली पोलिसांनी धाड घालून ९५ किलो अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली. देहलीमधील एक व्यापारी आणि मुंबईतील एका केमिस्ट (औषध विक्रेता) यांच्याकडे अमली पदार्थांचे जाळे चालवले जात होते. तसेच यात देहलीच्या तिहार कारागृहातील वॉर्डनचाही सहभाग असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.