Chinese Businesses To Face Loss In Diwali : दिवाळीमध्ये चिनी व्यापार्‍यांना १ लाख २५ सहस्र कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता

भारतियांकडून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य !

नवी देहली – ‘ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार देशभरात दिवाळीच्या खरेदीमध्ये चिनी वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे चीनच्या व्यापार्‍यांना जवळपास १ लाख २५ सहस्र कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

या संघटनेचे सरचिटणीस तथा देहलीतील चांदणी चौक मतदारसंघाचे खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, देशभरातील बाजारपेठांमध्ये ‘व्होकल फॉर लोकल’चा (स्थानिक ठिकाणी बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहनाचा) प्रभाव दिसत आहे. संपूर्ण बाजारात खरेदीसाठी असलेल्या ९० टक्के वस्तू या भारतीय आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. नागरिकांनी दिवाळीची खरेदी करतांना अधिकाधिक भारतीय वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.