काँग्रेसवर उत्तर मतदारसंघातून उमेदवार पालटण्याची नामुष्की !
कोल्हापूर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – काँग्रेस पक्षातूनच झालेल्या अंतर्गत विरोधामुळे काँग्रेसला उत्तर भागातील विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांना देण्यात आलेली उमेदवारी पालटण्याची नामुष्की ओढावली. यामुळे आवेदन भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर भाग विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे भोसले यांनी काँग्रेस पक्षाकडून आवेदन प्रविष्ट केले. यामुळे संतप्त झालेल्या राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आवेदन प्रविष्ट केले. दुसरीकडे राधानगरी मतदारसंघातून विद्यमान शिवसेना आमदार प्रकाश आबीटकर, तसेच विविध मतदारसंघांतून विविध पक्षांच्या उमेदवारांनी आवेदन प्रविष्ट केले. २९ ऑक्टोबर हा आवेदन प्रविष्ट करण्याचा शेवटचा दिनांक होता.