हिंदूंचे मत विभाजन न होण्यासाठी तिकीट परत केले ! – किशनचंद तनवाणी, महाविकास आघाडी
छत्रपती संभाजीनगर – मी जर उभा राहिलो असतो, तर हिंदूंचे मतविभाजन झाले असते. ‘एम्.आय.एम्.’चा उमेदवार निवडून आला असता. वर्ष २०१४ ची पुनरावृत्ती झाली असती, असा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी पक्षाला परत केली. त्यानंतर अवघ्या दोनच घंट्यांत मातोश्रीवरून चक्रे फिरली आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी वर्ष २०१४ सारखी स्थिती आता राहिली नाही, वर्ष २०२४ मध्ये मुसलमान केवळ ‘एम्.आय.एम्.’लाच मत देत नाही, तर शिवसेनेलाही मतदान करतात, असा दावा पत्रकार परिषदेत केला.