कल्याणीनगर प्रकरणातील ७ जणांवर दोषारोप निश्चितीचा मसुदा सादर !
पुणे – कल्याणीनगर अपघातामधील अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालटून पुरावे नष्ट केले होते. या प्रकरणात आरोपी असलेले अग्रवाल दांपत्य आणि ससूनच्या आधुनिक वैद्यांसह एकूण ७ जणांवर दोषारोप निश्चितीचा मसुदा पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. विशेष न्यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना डॉ. श्रीहरि हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची चौकशी करण्यासाठी अनुमती दिली आहे.