संपादकीय : हिंदूंनो, देशविरोधकांना ओळखा !
‘फेसबुक’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी स्वीकृती दिली की, अन्य आस्थापनांसमवेत ते अमेरिकेतील शासनाचे काही गुप्त विभाग (जे केवळ ‘व्हाईट हाऊस’लाच ठाऊक असतात), तेथील पोलीस यंत्रणा (एफ्.बी.आय) किंवा गुप्तचर यंत्रणा (सी.आय.ए.) यांच्याशी संबंध आहेत आणि त्यांच्यासाठी ते काम करतात. काही दिवसांपूर्वी बांगलादेशामधील सरकार पाडण्यात आले आणि तिथे महंमद युनुस या साम्यवादी नेत्याला पंतप्रधान करण्यात आले. ‘विकिलिक्स’ या अमेरिकेतील संस्थेने युनुस आणि हिलरी क्लिंटन अन् अन्य नेते यांच्याशी त्यांचे संबंध किती जवळचे आहेत, हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. गेली १६ वर्षे ते अमेरिकेसमवेत काम करत होते. (विशेषतः अमेरिकी) सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये गुप्त जाळे निर्माण करणार्या आणि सरकारी धोरणांवर प्रभाव टाकणार्या, म्हणजेच ‘डीप स्टेट’सारख्या विचारसरणीच्या शक्तींनी बांगलादेशाचे सरकार उलथवले. राजकीय नसलेल्या चेहर्याला पुढे करून अमेरिकेने त्यांना हवा तो माणूस बांगलादेशाच्या प्रमुखपदी बसवला. आता एक प्रकारे बांगलादेशात अमेरिकेला हवे तसे निर्णय घेता येऊ शकतात. आता अमेरिका तेथील बेटावर नियंत्रण ठेवणार्या त्यांच्या नौका ठेवू शकते, तेथून चीनला कशा प्रकारे कह्यात ठेवायचे आहे, ते ठरवू शकते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतासमवेतची तिला हवी तशी धोरणे ठरवण्यासाठी बांगलादेशाचाही वापर करू शकते. अशाच प्रकारचे सरकार उलथवण्याचे षड्यंत्र भारतविरोधी विचारसरणींना भारतासमवेत करायचे आहे. भारतातील मुसलमान नेत्यांनी उघडपणे केलेल्या वक्तव्यातून हे लक्षात आले. या विचारसरणींमध्ये ‘संपूर्ण जगाला ख्रिस्ती बनवू पहाणारी’, ‘संपूर्ण जगाला इस्लामी बनवू पहाणारी’ आणि ‘संपूर्ण जगाला साम्यवादी बनवू पहाणारी’, अशा प्रकारच्या ३ प्रमुख विचारसरणी संपूर्ण जगभर कार्यरत आहेत. ‘डीप स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणार्या या विचारसरणीचे उगमस्थान बर्याचदा अमेरिकेत असते आणि तिथेच त्या फोफावतात. अमेरिकेची काही भारतविरोधी धोरणे मध्ये मध्ये लक्षात येतात. ख्रिस्ती, इस्लामी आणि साम्यवादी या ३ प्रमुख विचारसरणी ‘डीप स्टेट’च्या रूपात कार्यरत असल्याने भारतात विविध माध्यमांतून जमेल तो जिहाद घडवणे, धर्मांतर करणे, अशांतता पसरवणे, दंगली घडवणे, निवडणुकांवर प्रभाव पाडणे, मोदी सरकारला अडचणीत आणणे, भारतातील जनतेत विविध प्रकारे फूट पाडणे, हे या तिन्ही विचारसरणींचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि प्रसंगी त्यासाठी या तिन्ही विचारसरणी जसे बांगलादेशाचे सरकार पाडण्यासाठी ख्रिस्ती अन् मुसलमान एकत्र आले, तशा एकत्रही येतात. या सर्वांना जगभरात त्यांचे पाय पसरवायचे असल्याने ते एकमेकांवर कुरघोडी करतातच; परंतु त्या व्यतिरिक्त या सर्वांपेक्षा वेगळी अशी शक्ती पृथ्वीवर आहे आणि ती म्हणजे सहिष्णु हिंदूंची ! त्यामुळे या शक्तीचा प्रश्न येतो, तेव्हा या तिन्ही विचारसरणींचे लोक एकत्र येतात. इस्लामी आणि साम्यवादी यांची भारतात असणारी पूर्वीपासूनची युती गेली ७० दशके हिंदूंच्या मुळावर उठलेली आहे, हे हिंदू अनुभवत आहेत.
अमेरिका आणि संबंधित खासगी संस्था यांची भारतविरोधी भूमिका
पर्यावरण, मानवतावाद, लोकशाही असे काही फुकाचे विषय घेऊन अमेरिकास्थित विविध खासगी; परंतु तेथील सरकारशी संबंधित संस्था जगभर काम करतात आणि विविध देशांतील अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करणे, तेथील सरकारी विचारसरणीवर प्रभाव टाकणे आदी गोष्टी करत असतात. भारतातही निवडणुका घोषित झाल्यावर अमेरिकेतील विविध नेते विरोधी पक्षांतील विविध नेत्यांना भेटल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. भारतात त्यांच्या विचारांचे सत्ताधारी येण्यासाठी अमेरिकेला किंवा तेथील काही गटांना भारतातील निवडणुकांवर येनकेन-प्रकारेण प्रभाव टाकायचा असतो.
भारताच्या शत्रूंमध्ये आता खलिस्तान्यांची भर पडल्याने अमेरिका त्यांना संरक्षण देत आहे. गेल्या २ वर्षांत अमेरिकेत स्थायिक हिंदूंच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या झाल्या आहेत. अमेरिका आणि कॅनडा येथील हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणेही होत असतात. भारतातील हिंदुत्वनिष्ठ संस्था आणि व्यक्ती यांच्याशी संबंधित सामाजिक माध्यमांवरील सामुग्री ही अधिक प्रसारित कशी होणार नाही, याची पूर्णपणे नियोजनबद्ध काळजी ‘फेसबुक’, ‘एक्स’ आणि ‘यू ट्यूब’ यांसारख्या आस्थापनांकडून घेतलेली असते. याचे कुठलेच नियंत्रण भारतातील शासनाच्या हातात नाही. याचे मूळही याच भारतविरोधी आणि हिंदुद्वेषी विचारसरणीत आहे. भारतातील अनेक शास्त्रज्ञांचे, स्वदेशीचे पुरस्कर्ते असणार्यांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. अमेरिकेचे पाकप्रेमही मध्ये मध्ये उफाळून येत असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात लोकप्रिय नेता झाल्याने, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय असल्याने आणि भारताची आर्थिक कमान उंचावल्याने मोदी अन् भारत यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याखेरीज अमेरिकेला पर्यायच उरला नाही; अन्यथा एकेकाळी अमेरिकेने मोदी यांना त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली होती, हे कुणी विसरू शकत नाही. भारत जेव्हा जेव्हा रशियाशी काही मैत्रीपूर्ण चर्चा किंवा संबंध प्रस्थापित करत असतो, तेव्हा तेव्हा अमेरिकेकडून काही ना काही भारताशी संबंधित कठोर विधान प्रसारित केले जाते. योगेंद्र यादव यांच्यासारखे भारतातील काही साम्यवादी, तसेच काही मुसलमान नेते मधून मधून राष्ट्रद्रोही वक्तव्ये करून नागरिकांना अशांती पसरवणारी आंदोलने करण्यासाठी उसकावत असतात. त्यांचा बोलविता धनी हा ‘डीप स्टेट’रूपी विचारधारा आणि त्या जोपासणार्या विदेशी संस्था असतात. भारतात अंनिस, अनेक ख्रिस्ती संस्था यांना हिंदु धर्मावरील श्रद्धा मोडून काढणे, नक्षलवाद पसरवणे, धर्मांतर करणे आदी कामांसाठी अमेरिकास्थित संस्थांकडून मोठ्या प्रमाणात पैसे येत असल्याचे सिद्ध झाल्याने मोदी शासनाने त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला. अमेरिकी सरकारच्या गुप्त यंत्रणा आणि खासगी संस्था ही व्यवस्था अन् भारतातील तथाकथित विचारवंत, प्रतिथयश कलाकार, पत्रकार, लेखक, काँग्रेससारख्या पक्षाचे नेते, अशासकीय संस्था आदी यांची एक ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) या विचारसरणीने सिद्ध केली आहे. या अंतर्गत भारतविरोधी विचारसरणीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात पुरस्कारही देण्यात येतात. या सर्वांद्वारे सोनम वांगचुक यांच्यासारखी व्यक्तीमत्त्वे निर्माण करून पोसली जातात. काही आध्यात्मिक गुरूंवरही या विचारधारांनी प्रभाव टाकल्याचे बोलले जाते. भारतविरोधी ‘फोर्ड फाऊंडेशन’ या संस्थेशी रतन टाटा हेही संलग्न असल्याचे म्हटले गेले. हा सारा धोका ओळखून आपला कोण ? आणि शत्रू कोण ? हे ओळखून हिंदूंनी प्रत्येक पाऊल सावधानतेने उचलायला हवे, हेच खरे !
हिंदूंनो, बांगलादेशाप्रमाणे भारतातील सरकारही उलथवण्याचे अमेरिकेचे भारतविरोधी धोरण लक्षात घेऊन सावधानता बाळगा ! |