गुरुपादुकांचा वाटे मज हेवा ।
‘२१.७.२०२४ या दिवशी गुरुपौर्णिमा झाली. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे २०.७.२०२४ या दिवशी प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) प्रार्थना करतांना त्यांच्या कृपेने मला एक काव्य सुचले. ते त्यांनीच माझ्याकडून लिहून घेतले. ते त्यांच्याच चरणी अर्पण करते.’
गुरुपादुकांचा वाटे मज हेवा ।
गुरुचरणांचा मिळे त्यांना ठेवा ।। १ ।।
नित्य मिळे त्यांना गुरुचरणी स्थान ।
सार्या तीर्थक्षेत्रांत एकच जे मोक्षधाम ।। २ ।।
‘स्व’ला झिजवूनी केली त्यांनी गुरुभक्ती ।
म्हणूनी गुरुपूजनात सर्वत्र त्यांची महती ।। ३ ।।
त्याग शरणागती अन् संपूर्ण समर्पण ।
गुरुसेवेसाठी केले सर्वस्व अर्पण ।। ४ ।।
गुरुपादुका गाती गुरूंची गाथा ।
मिळे समाधान टेकविता माथा ।। ५ ।।
गुरुपादुकांचे स्थान असे गुरुचरणी ।
सदैव राहो मम हृदयमंदिरी ।। ६ ।।
– गुरुदेवांची चरणसेवक,
सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |