अखेर नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला !

 नवाब मलिक

मुंबई – दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेले आणि ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात अटक होऊन ५ महिने कारागृहात असणारे माजी मंत्री नवाब मलिक यांनी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यांना मानखुर्द येथील शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीतील अन्य पक्षांचा मलिक यांना आरंभी विरोध होता. दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून प्रचलित बाजारभावापेक्षा अल्प किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेला होता.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी काही वेळापूर्वी त्यांना हा अर्ज देण्यात आला. भाजपचा विरोध पत्करून कि भाजपची मनधरणी करून अजित पवार यांनी हा अर्ज दिला, याची आता चर्चा आहे.  या मतदारसंघात महाविकास आघाडीचा मित्रपक्ष समाजवादी पक्षाच्या वतीने   आमदार अबू आझमी यांनी अर्ज भरला आहे. मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मलिक यांनी शक्तीप्रदर्शन करून मिरवणूक काढत हा अर्ज भरला. मलिक यांच्या पारंपरिक अणुशक्तीनगर मतदारसंघातून त्यांची मुलगी सना मलिक विधानसभा लढवणार आहे.