साजरी करण्या दीपावली मनमंदिरी, या गुरुराया मम अंतरी ।
१२.११.२०२३ (नरकचतुर्दशी) या दिवशी देवाला प्रार्थना केल्यावर मला पुढील ओळी सुचल्या आणि त्यानंतर देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली.
सडा घातला प्रार्थनेचा ।
रांगोळी काढली कृतज्ञतेची ।। १ ।।
तोरणे लावली भावाची ।
अन् दीप लावले नामाचे ।। २ ।।
फराळ असे हा भक्तीचा ।
अशी सिद्धता झाली दीपावलीची ।। ३ ।।
साजरी करण्या दीपावली मनमंदिरी ।
या हो गुरुराया मम अंतरी ।। ४ ।।
हीच प्रार्थना असे शरणागतीची ।
हीच खरी दीपावली साधकांची ।। ५ ।।
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |