साधनेची आवड असलेले आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दीप पाटणे !
१. घरकामात साहाय्य करणे
‘पूर्वी दीप आश्रमातून घरी आल्यावर त्याचा अधिक वेळ भ्रमणभाष पहाणे किंवा झोपणे यांकडे कल होता; मात्र जुलै २०२४ मध्ये तो घरी आल्यानंतर त्याने मला घरकामात साहाय्य केले, उदा. स्वयंपाक करण्यात साहाय्य करणे, पाणी भरणे, बाहेरचे साहित्य आणणे. त्याने घरातील सर्व अनावश्यक साहित्य काढून टाकले.
२. समंजस
आम्हा दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाल्यास दीप आम्हाला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन उपाययोजना काढतो आणि आम्हाला साहाय्य करतो. आम्हाला व्यावहारिक अडचण आल्यास तो सांगतो, ‘‘गुरुदेव आपली काळजी घेणार आहेत. गुरुदेव आपली सर्वांची साधना करून घेणार आहेत.’’
३. साधनेची आवड
अ. दीप पाचवीत असतांना आम्ही त्याला एक वर्ष मिरज येथील सनातनच्या आश्रमात त्याची साधना होण्यासाठी आणि तेथील शाळेत जाण्यासाठी ठेवले होते. तेव्हा त्याच्या समवेत लहान मुले नसल्यामुळे त्याला करमत नव्हते, तरीही तो वर्षभर तेथे राहिला.
आ. त्याला कधीही ‘सेवा आणि साधना सोडून नोकरी करावी’, असे वाटले नाही. तो आश्रमात राहून साधना करण्यावर ठाम आहे.
इ. तो रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना त्याच्या मनात वयानुसार, तसेच अन्य परिस्थितीनुसार येणार्या विचारांवर मात करण्यासाठी तो वेळोवेळी उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घेतो आणि त्यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न करतो.
ई. तो घरी आल्यावर अनेक नातेवाईक त्याला म्हणाले, ‘‘तुझ्या वडिलांची ‘अँजिओप्लास्टी’ (टीप) झाली आहे. त्यांना पुढे नोकरी किंवा काम करता येणार नाही. तू आता नोकरी करायला हवीस.’’ तेव्हा दीपने ‘आश्रमात राहून साधनाच करायची आहे’, असा निश्चय केला. (टीप -‘अँजिओप्लास्टी’: हृदयाकडे रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यांतील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म)
४. साधकांनी दीपचे कौतुक करणे आणि ‘दीप आश्रमात रहात असल्याने त्याच्या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटणे
आम्ही दोघे रामनाथी आश्रमात आल्यावर आम्हाला अनेक साधकांनी दीपविषयी चांगले सांगितले. अनेक साधक आम्हाला सांगत होते, ‘‘दीप इतरांना साहाय्य करतो. तो अंतर्मुख असतो. तो नवीन गोष्टी शिकून घेतो. त्याने अनेक संतांचे मन जिंकले आहे. तो पुष्कळ आनंदी असतो. तो सर्वांशी मिळून मिसळून वागतो.’’ हे ऐकल्यानंतर आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि ‘दीप आश्रमात रहात असल्याने त्याच्या जीवनाचे सार्थक झाले’, असे आम्हाला वाटले.
५. गुरूंप्रती श्रद्धा वृद्धींगत होणे
‘प्रत्येक प्रसंगात आमची साधना कशी होऊ शकते ? आमची गुरूंप्रती श्रद्धा कशी वाढेल ?’, अशी दीपची तळमळ आहे. त्याच्यामधील ‘इतरांना साहाय्य करणे आणि गुरूंप्रती श्रद्धा’ या गुणांत वृद्धी झाली आहे.
‘गुरुदेवांनी आम्हाला साधना करण्यासाठी बळ आणि शक्ती द्यावी अन् आमचा उद्धार करावा’, अशी आम्ही गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– सौ. शुभांगी पाटणे आणि श्री. संतोष पाटणे (श्री. दीप यांचे आई-वडील), सांगोला, जिल्हा सोलापूर. (४.१०.२०२४)
वडिलांची ‘अँजिओप्लास्टी’ होण्याच्या कालावधीत आणि नंतर वडिलांची सर्व प्रकारे काळजी घेणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दीप पाटणे !
१. माझी ‘अँजिओप्लास्टी’ करायची होती. तेव्हा मला नामजपादी उपाय करायचे होते. त्या वेळी दीपने मी वेळोवेळी ‘नामजपादी उपाय करत आहे ना’, याकडे प्रामुख्याने लक्ष दिले.
२. माझी ‘अँजिओप्लास्टी’ झाल्यानंतर दीपने केलेली माझी सेवा पाहून आमच्या नातेवाइकांनी दीपचे कौतुक केले. त्या वेळी तो त्यांना म्हणाला, ‘‘हे सर्व साधनेमुळे आणि देवाच्या कृपेमुळे झाले आहे.’’
३. ‘माझी ‘अँजिओप्लास्टी’ झाल्यानंतर काही दिवसांनी ‘मला नामजपादी उपाय मिळावेत, माझ्या नामजपादी उपायांमध्ये सातत्य यावे आणि माझी साधना व्हावी’, यासाठी आम्ही (मी आणि दीपची आई) रामनाथी आश्रमात यावे’, अशी दीपची तळमळ होती.’
– श्री. संतोष पाटणे (श्री. दीप यांचे वडील), सांगोला, जिल्हा सोलापूर (४.१०.२०२४)