Mira Road Mumbai Jihadis Attack : मीरारोड येथे फटाके वाजवणार्‍या हिंदूंवर युवकांवर मुसलमानांकडून आक्रमण !

ठाणे – मीरारोड येथे घराजवळ फटाके वाजवणार्‍या हिंदु युवकांवर १० ते १२ मुसलमानांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये ५ हिंदु युवक गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ‘@SuddhVichar’ नावाच्या ‘एक्स’ खात्यावरून २७ ऑक्टोबर या दिवशी याविषयीचा व्हिडिओ प्रसारित करून या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

येथे एक हिंदु युवक फटाके फोडत असतांना रस्त्यावरून दुचाकीवरून जाणार्‍या मुसलमान युवकाने त्याला हटकले. या वेळी मुसलमान युवकाने हिंदु युवकाला शिव्या देऊन मारहाण केली. या प्रकारानंतर हिंदु युवकाने त्याचा भाऊ आणि मित्र यांना बोलावून घेतले; मात्र त्याच वेळी १० ते १२ मुसलमान युवकांनी येऊन हिंदूंना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. मुसलमानांनी हिंदूंवर धारदार चाकूने वार केले.

मारहाण करणार्‍या मुसलमान युवकांच्या विरोधात हिंदूंनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली; मात्र ‘तक्रार नोंदवल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही’, अशी प्रतिक्रिया हिंदु युवकांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. हिंदु युवकाने दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणार्‍या मुसलमान युवकांनीच हिंदूंच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. (नेहमीप्रमाणे ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘कायद्याचा धाक नसलेले धर्मांध हिंदूंवर आक्रमणासाठी निमित्तच शोधतात. एकही हिंदूंचा सण धर्मांधांच्या आक्रमणाविना जात नाही’, असे सातत्याने घडणार्‍या अशा घटनांवरून दिसून येते. हिंदूंना शांततेने सण साजरे करता येण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
  • पोलीस दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, हे नेहमीचेच आहे. पोलीस हिंदूंचे संरक्षण करण्यास असमर्थ आहेत, हेच अशा घटनांवरून वारंवार दिसून येते. यासाठी हिंदु युवकांना स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यावाचून पर्याय नाही, असे कुणाला वाटल्यात त्यात चुकीचे काय ?