Waqf Board LandJihad Ahilyanagar : अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाचा दावा !

  • भूमी दर्ग्याच्या मालकीची असल्याचा दावा !

  • वक्फ न्यायाधिकरणाने मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सदस्य यांना मंदिरात येण्यापासून रोखले !

राहुरी तालुक्यातील मौजे गुहा येथील श्री कानिफनाथ मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा

अहिल्यानगर – येथील राहुरी तालुक्यातील मौजे गुहा येथील श्री कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर भूमीवरून वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थान यांच्यात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की, ही भूमी एका दर्ग्याच्या मालकीची असून वर्ष २००५ मध्ये वक्फ कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली होती.

ब्रिटीश काळापूर्वीच्या या भूमीची मालकी सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे असल्याचे ‘कानिफनाथ मंदिर ट्रस्ट’चे म्हणणे आहे. कानिफनाथ मंदिर पाडून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न चालू असता हा वाद आणखी चिघळला आहे. हे प्रकरण वक्फ न्यायाधिकरणाकडे पाठवण्यात आले. त्यांनी कानिफनाथ मंदिराच्या रचनेत कोणताही पालट न करण्याचा आदेश दिला आहेत. यासमवेत १९ मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सदस्यांना या ठिकाणी येण्यापासून रोखण्यात आले.

कानिफनाथ मंदिराचे विश्‍वस्त श्रीहरि आंबेकर यांची प्रतिक्रिया

कानिफनाथ मंदिराचे विश्‍वस्त श्रीहरि आंबेकर यांनी सांगितले की, ही भूमी पूर्वी शंकर भाई यांच्या पत्नी बिबन यांना सेवेसाठी दिली होती. यानंतर वर्ष २००५ मध्ये काही स्थानिक मुसलमान रहिवाशांनी वक्फ कायद्याच्या प्रक्रियेचा अपवापर करून ही भूमी वक्फच्या नावावर नोंदवली. मंदिराच्या विश्‍वस्तांना नोंदणीची माहिती देण्यात आली नव्हती. त्या वेळीही ही भूमी कानिफनाथ देवस्थानाची असून तुम्ही केवळ व्यवस्थापक आहात, यावर तुमचा कोणताही अधिकार नाही, असे निरीक्षण राहुरी जिल्हा न्यायालयाने नोंदवले होते.

कानिफनाथ महाराजांनी मंदिरातून आपल्या अलौकिक शक्तीने गुप्त भ्रमण करण्यासाठी भुयारी मार्गही सिद्ध केला होता. तो अजूनही आहे. आज त्याचे अवशेष आहेत; म्हणून या भुयारी मार्गामुळे मौजे गुहा गावास गुहा हे नाव पडले. याविषयीची संपूर्ण माहिती ही हिंदु धर्मातील धर्मग्रंथ ‘श्री नवनाथ भक्तीसार’ या ग्रंथात नमूद केलेली आहे. हा महत्त्वाचा पुरावा आहे. कानिफनाथ महाराज तिथे राहिल्यामुळे भक्तांनी त्यांच्या ध्यानधारणेसाठी हे मंदिर बांधले. नंतर त्या ठिकाणी औरंगजेबाचे आक्रमण झाल्यानंतर त्या भक्तांचे धर्मांतर केले आणि त्यांना तिथली ती भूमी बक्षीस म्हणून दिली. धर्मांतरामुळे ते मुसलमान झाले; पण ते मूळचे मराठा (हिंदु) आहेत.

संपादकीय भूमिका

धर्मांध लोक आणि वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी गिळंकृत करत आहे ?, हेच यावरून दिसून येते. वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !