Kerala Temple Firecracker Blast : केरळमध्ये मंदिराच्या महोत्सवासाठी आणलेल्या फटक्यांना लागली आग : १५० जण घायाळ
थिरूवनंतपुरम् (केरळ) – केरळमधील नीलेश्वरम् येथे वीरारकवू मंदिर महोत्सवात आतिषबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फटाके मागवण्यात आले होते. मंदिर परिसरातच एका बाजूला हे फटाके रचून ठेवले होते. याच ठिकाणी २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आग लागली. महोत्सव असल्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. या आगीमुळे १५० जण घायाळ झाले. त्यांपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घायाळांवर कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील रुग्णालयांत उपचार चालू आहेत.
जिल्हाधिकार्यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोचून परिस्थितीची पहाणी केली. या घटनेचे अन्वेषण चालू करण्यात आले आहे.