अज्ञातांकडून कोल्हापूर येथे काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक !
कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर भाग विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. येथे तिसर्या सूचीत काँग्रेसने माजी नगरसेवक लाटकर यांना उमेदवारी घोषित केली. हे नाव घोषित होताच अज्ञातांकडून काँग्रेसच्या कार्यालयावर कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. शनिवारी रात्री साडेबारा वाजता दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर कार्यालयाच्या परिसरात शाहूपुरी पोलिसांनी पोलीस तैनात केले आहेत.