मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला !
मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखडी या विधानसभा मतदारसंघातून २८ ऑक्टोबर या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. आनंदमठ येथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन एकनाथ शिंदे यांनी अर्ज भरला. येथील वागळे इस्टेटपासून भव्य मिरवणूक काढून एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.