पैंगीण निवासी दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांना ‘वेदांतरत्न’ उपाधी प्राप्त !
गोव्यातील वेदशास्त्र परंपरेत आणखी एक मानाचा तुरा !
पैंगीण – येथील टेंग्से कुलोत्पन्न तर्करत्न श्री. दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांनी वेदांत शास्त्रामध्ये संपूर्ण अद्वैतवेदांत शास्त्राची ‘तेनाली’ येथे महापरीक्षा देऊन २७ ऑक्टोबर या दिवशी ‘वेदांतरत्न’ ही उपाधी कांची पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्याकडून प्राप्त केली. श्री. दत्तानुभव यांनी रिवण, सांगे, गोवा येथील ‘श्रीविद्या पाठशाळेत’ महामहोपाध्याय पं. देवदत्त पाटील आणि पं. राजेश्वरशास्त्री देशमुख यांच्याकडे न्यायशास्त्राचे अध्ययन पूर्ण करून चेन्नईमध्ये राहून महामहोपाध्याय पं. मणिद्राविड गुरुजींकडे वेदांत शास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. संपूर्ण भारतामध्ये २ शास्त्रांमध्ये महापरीक्षा देणारे हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे आहेत. त्यामध्ये श्री. दत्तानुभव हे एक आहेत. दीपावलीच्या पूर्वसंध्येला या यशाबद्दल सर्व स्तरांवर त्यांचे अभिनंदन होत आहे.