१० वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा, हे व्यवस्थेला लज्जास्पद !
‘कोप्पल जिल्हा न्यायालयाने नुकतीच एकाच वेळी १०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सामूहिक शिक्षा देशातील कोणत्याही जातीसंबंधित प्रकरणातील सर्वोच्च शिक्षा आहे. या सर्वांना २८ ऑगस्ट २०१४ या दिवशी गंगावती तालुक्यातील मार्कुंबी गावात झालेल्या जातीय हिंसाचारासाठी दोषी ठरवण्यात आले होते. हिंसाचाराच्या वेळी ११७ लोकांनी दलितांच्या झोपड्या पेटवल्या होत्या; तथापि १० वर्षे चाललेल्या खटल्याच्या कालावधीत १६ आरोपींचा मृत्यू झाला. (२६.१०.२०२४)