साधनेची ओढ असलेला आणि गुरूंप्रती भाव असलेला लुधियाना येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. पारस कश्यप (वय १२ वर्षे) ! 

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. पारस कश्यप हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. पारस कश्यप याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)

२९.१०.२०२४ (आश्विन कृष्ण द्वादशी) या दिवशी कु. पारस कश्यप याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. पारस कश्यप
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. पारस कश्यप याला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

श्री. प्रमोद कश्यप

१. गेल्या वर्षभरात कु. पारसमध्ये झालेले पालट

अ. ‘तो आवश्यकता नसल्यास विजेचे दिवे आणि पंखे बंद करतो.

आ. त्याला काही त्रास होत असल्यास ‘गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) समवेत आहे’, असा भाव ठेवतो.

इ. तो स्वयंप्रेरणेने वेगवेगळ्या देवतांची सुंदर चित्रे काढतो आणि त्यात त्याला आनंदही मिळतो.

ई. घरी कोणी साधक आल्यास त्याला पुष्कळ आनंद होतो. त्यांना तो त्याने काढलेली देवतांची चित्रे दाखवतो.

उ. आम्हाला आध्यात्मिक त्रास होत असल्यास तो नामजपादी उपाय करण्यास सांगतो.

 ऊ. तो कठीण परिस्थितीतही शांत रहातो.

२. कु. पारस याला साधनेप्रति असलेली ओढ

अ. तो रात्री झोपतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ डोक्याखाली ठेवतो.

 आ. तो प्रतिदिन कुंकू लावतो.

 इ. त्याला त्रास होत असेल, तेव्हा तो नामजपादी उपाय करतो.

 ई. तो तिन्ही मोक्षगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) अनुसंधानात रहातो.

 उ. तो नेहमी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाविषयी विचार करत असतो आणि तेथे जाण्याविषयी सांगत असतो.

सौ. माधवी कश्यप

३. घरकामात साहाय्य करणे : तो आई आणि आजी यांना घरातील कामांत साहाय्य करतो. तो त्याच्या क्षमतेप्रमाणे मन लावून आणि आनंदाने साहाय्य करतो. तो आईला नेहमी सांगतो, ‘‘मला जेवण बनवायला शिकव, म्हणजे मी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात जाऊन तेथील साधकांसाठी पंजाबी पद्धतीचे जेवण बनवीन.’’

४. संत आणि गुरु यांच्याप्रती भाव : जून २०२३ मध्ये त्याची मोठी शस्त्रक्रिया झाली. त्या वेळी तो १५ दिवस रुग्णालयात होता. तेव्हा त्याला ‘मी गुरुदेवांच्या आश्रमातच आहे’, असे वाटत होते. तो सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेला नामजप  सतत करत होता, तसेच ‘आता नामजपादी उपायांची वेळी झाली आहे’, असे आम्हालाही सांगायचा. ‘तिन्ही मोक्षगुरु त्याच्या समवेत आहेत’, असे त्याला वाटत होते. शस्त्रक्रिया झाल्यावर शुद्धीवर येत असतांना त्याला आधुनिक वैद्यांच्या ठिकाणी गुरुदेवच दिसत होते.

५. ‘जन्मदात्या आई-वडिलांच्या ऐवजी गुरुच आपले आई-वडील आहेत’, असे वाटणे : शस्त्रक्रियेच्या १५ दिवसांनंतर पारसची तपासणी करण्यासाठी त्याला भूल देण्यात आली होती. अर्धवट शुद्धीत आल्यावर त्याने आम्हाला, म्हणजे जन्मदात्या आई-वडिलांना ओळखण्यास नाकारले आणि तो ओरडून सांगू लागला, ‘‘माझ्या खर्‍या आई-वडिलांना पाठवा.’’ आम्ही आमच्या नातेवाईकांची छायाचित्रे दाखवली; पण त्याने कुणालाच ओळखले नाही आणि रडत राहिला. तो म्हणू लागला, ‘‘मला माझे आई-वडील हवे आहेत.’’ त्यामुळे आम्हालाही भीती वाटू लागली. नंतर आम्ही गुरुदेवांना मानस आत्मनिवेदन केले. त्या वेळी त्यांचे छायाचित्र दाखवण्याचा विचार आमच्या मनात आला.  आम्ही पारसला गुरुदेवांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा तो म्हणू लागला, ‘‘हे माझे खरे वडील आहेत.’’ नंतर दोन्ही गुरुमातांचे छायाचित्र दाखवल्यावर ‘याच माझ्या आई आहेत. यांना माझ्याकडे पाठवा’, असे सांगू लागला. तेव्हा आम्ही त्याला सांगितले, ‘तू आता झोप. ते वैद्यांजवळ बसले आहेत. तू उठल्यावर ते तुझ्याजवळ येतील.’ त्यांनतर पारस झोपला. उठल्यावर तो पूर्वीप्रमाणे सामान्य स्थितीत आला.

६. धर्माभिमान : देवतांच्या मूर्तींचे विडंबन पाहून त्याला चीड येते.

७. साधक आणि आश्रम यांची ओढ असणे : पारस नेहमी मनाने रामनाथी आश्रमात असतो. त्याच्या मनात आश्रमातील साधकांचाच विचार असतो. त्यांच्याविषयी तो बोलत असतो. ज्या दिवशी त्याला रामनाथीच्या साधकांची पुष्कळ आठवण येते, त्या दिवशी त्याला तेथील कुणाचा तरी दूरध्वनी येतो.

– श्री. प्रमोद कश्यप (वडील) आणि सौ. माधवी कश्यप (आई), लुधियाना, पंजाब. (२१.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.