Census : पुढील वर्षी जनगणना होण्याची शक्यता !
नवी देहली – गेली ४ वर्षे प्रलंबित असणारी देशातील जनगणना पुढील वर्षी चालू होण्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. केंद्र सरकार वर्ष २०२५ मध्ये जनगणनेला प्रारंभ करून वर्ष २०२६ पर्यंत ती पूर्ण करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नियोजन चालू केल्याचे म्हटले जात आहे. केंद्र सरकारने या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रत्येक १० वर्षांनी देशात जनगणना केली जात होती. वर्ष २०२१ मध्ये ही जनगणना होणे अपेक्षित होते; मात्र कोरोनामुळे ती होऊ शकली नव्हती आणि त्यांनरतही ती झाली नाही.
जनगणना झाल्यानंतर देशाची एकूण लोकसंख्या समजू शकणार आहे. त्यातही कोणत्या धर्माच्या नागरिकांची किती संख्या आहे ?, हेही स्पष्ट होणार आहे. या जनगणनेनंतर लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होऊ शकणार आहे. या जनगणनेमध्ये जातीनुसार गणना करण्याची मागणी केली जात आहे. ती होणार कि नाही ?, हेही त्या वेळी स्पष्ट होईल.