Namaz in Ram Temple : ३ वृद्ध मुसलमानांनी श्रीराममंदिराच्या परिसरात केले नमाजपठण

  • शाजापूर (मध्यप्रदेश) घटना !

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवून नोटीस देऊन सोडले !

श्रीराम मंदिर व नमाजपठण करणारे मुसलमान

शाजापूर (मध्यप्रदेश) – येथील किलोडा गावातील श्रीराम मंदिरात ३ मुसलमानांनी बलपूर्वक नमाजपठण केले. रुस्तम (वय ६५ वर्षे), अकबर (वय ८५ वर्षे) आणि बाबू खान (वय ७० वर्षे) अशी आरोपींची नावे असून ते तिघेही भाऊ आहेत. पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कह्यात घेतले; मात्र नंतर नोटीस देऊन सोडून दिले. ही घटना २६ ऑक्टोबरला घडली. हे कृत्य आमच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे सांगत स्थानिक हिंदू समुदायाने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे भाऊ बँकेत काही काम करून परतत होते. त्यानंतर नमाजाची वेळ झाली आणि तिघेही मंदिराच्या आवारात नमाजपठण करू लागले.

२. पुजारी ओमप्रकाश यांनी तक्रारीत म्हटले आहे की, अकबर, रुस्तम आणि बाबू खान सायंकाळी ५.४५ वाजता मंदिरात आले होते. या तिघांनी मंदिरात ठेवलेल्या मडक्यातील पाण्याने हातपाय धुतले आणि मंदिराच्या आवारात बसून नमाजपठण केले. विरोधाला न जुमानता ते अनुमाने २० मिनिटे मंदिराच्या आवारात थांबले आणि नंतर तेथून निघून गेले.

३. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून बाबू, रुस्तम आणि अकबर यांना कह्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपींनी चूक मान्य केली. पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडले. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण आणि कायदेशीर कार्यवाही चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • उद्या वृद्ध हिंदूंनी मशिदीच्या परिसरात जाऊन भजने म्हटली किंवा मोठ्या आवाजात नामजप केला, तर मुसलमान पोलिसांकडे तक्रार न करता त्यांच्या पद्धतीने कायदा हातात घेतील !
  • हिंदूंच्या मंदिराच्या परिसरात येऊन नमाजपठण करण्याचे मुसलमानांचे धाडस होते, हिंदूंंचे असे धाडस मशिदीत नामजप करण्याचे होऊ शकेल का ? हिंदु सहिष्णु असल्यानेच मुसलमान निश्‍चिंत असतात, तर धर्मांध हिंसक असतात, त्यामुळे हिंदू घाबरतात !