‘गाय आणि तिचे वासरू’ यांच्यामधील सात्विकता अनुभवणारे फोंडा, गोवा येथील श्री. प्रसाद कामत !
‘मी वळवई, फोंडा, गोवा येथे रहात असून दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. मी एक गाय विकत घेतली आहे. त्या गायीला वासरू झाले. मला गाय आणि वासरू यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. गायीची वैशिष्ट्ये
अ. ‘मी सकाळ-संध्याकाळ गायीला चारा घालतांना गायीचे डोके आणि पाठ यांवरून हात फिरवतो. तेव्हा मी मोठ्याने ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करतो.
आ. ही गाय शिळे अन्न किंवा ‘प्लास्टिक’ खात नाही. ती हिरवा पाला खाते.
इ. सध्या अन्य गायींच्या शेणाला एक प्रकारचा वास येतो; पण माझ्याकडील गायीच्या शेणाला वास येत नाही. दूध काढण्याच्या वेळी गाय वासराला चाटते. तेव्हा ती मलाही चाटत असते.
२. वासराची वैशिष्ट्ये
अ. माझ्याकडील गायीला झालेले वासरू ८ दिवसांचे आहे. मी नामजप करत गायीची सेवा केल्यामुळे ‘या वासराच्या डोक्यावर शंखासारख्या आकाराचे पांढरे केस आहेत’, अशी माझी श्रद्धा आहे.
आ. वासराला सकाळी गायीचे दूध पाजल्यावर ते दिवसभर शांत असते. आम्ही सायंकाळी पुन्हा वासराला दूध पाजतो.’
– श्री. प्रसाद कामत, वळवई, फोंडा, गोवा. (१४.५.२०२४)