मुंबईच्या किमान तापमानात घट !

मुंबई – मुंबईत रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती असून किमान तापमानाचा पारा २१.४ अंश सेल्सिअस गेला होता. ऑक्टोबर महिन्यात प्रथमच किमान तापमानात ३ अंश सेल्सिअसने घट झाली. मात्र कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याने दिवसा उकाडा कायम आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा, अशा हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. किमान तापमानात घसरण झाली असली, तरी सध्या कमाल तापमानाचा पारा अधिकच आहे. सध्या उत्तरेकडून वारे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. काही दिवसांनी पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र येथे हलक्या सरींची शक्यता आहे.