Indian Fishermen Arrest : श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये अवैधरित्या मासेमारी केल्याच्या आरोपाखाली १२ भारतीय मासेमारांना अटक केली. तसेच त्यांची नौकाही जप्त केली. श्रीलंकेकडून अशा घटनांमध्ये पकडलेल्या भारतीय नागरिकांची संख्या आता ४६२ झाली असून त्यांच्या ६२ नौकाही जप्त केल्या आहेत.
श्रीलंकेच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सांगितले की, २ शेजारी देशांमधील वारंवार उद्भवणार्या मासेमारीच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी १२ सदस्यीय भारतीय संघ २९ ऑक्टोबरला श्रीलंकेत येणार आहे. दोन्ही देशांतील मासेमारांना अनेकदा नकळत एकमेकांच्या प्रादेशिक पाण्यात प्रवेश केल्यासाठी अटक केली जाते. (असे होऊ नये; म्हणून दोन्ही देशांच्या सागरी सीमेवर मासेमारांना सीमा लक्षात येण्यासाठी चिन्हे लावण्याचा उपाय का काढला जात नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिकासातत्याने घडणार्या अशा घटना रोखण्यासाठी सरकार ठोस उपाय का काढत नाही ? |